HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नका – रामदास आठवले

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करु नका असे आवाहन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आज (७ ऑक्टोबर) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपुरातील दीक्षाभूमीवरही ४ ते ५ लाख लोक जमतात. तिथेही लोकांनी येऊ नये अशी विनंती मी करत आहे. जसे इतर सण अतिशय साधेपणाने साजरे केले तसेच या दोन दिवशी लोकांनी आपल्या घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आठवले म्हणाले.जसे आपण सण साधेपणाने साजरे केले तसेच या दोन दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा असेही आठवले यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबरला दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. यंदा करोना संकट आणि या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, गर्दी करु नये असे आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. चैत्यभूमीचं ऑनालइन दर्शन देण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत असंही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम 36 महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “दादरच्या इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरकाबाबत आज मी एमएमआरडीए, शापूरजी पालनजी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच चैत्यभूमीच्या स्तूपाची डागडुजी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. हे स्तूप जीर्ण अवस्थेत असून कधीही पडण्याची भीती आहे, असे आठवले म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk

२४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम ‘राजपथ’च्या नावावर, लिम्का बुकमध्ये झाली नोंद

News Desk

शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे असं म्हणून दौरा पुढे ढकलू शकले असते, अजित पवारांचा राज्यपालांना टोला

News Desk