HW News Marathi
Covid-19

कोरोना पॉझिटिव्ह असताना डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये ग्रँड एन्ट्री

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. ४ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ४ दिवस उपचार घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार डोनाल़्ड ट्रम्प अद्यापही करोनामधून पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत. परंतु त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये ग्रॅंन्ड एन्ट्री केली आहे. ट्रम्प अद्यापही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु तब्येतीत काही सुधारणा दिसल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांची ऑक्सिजनची पातळीही सामान्य असून त्यांना व्हाईट हाऊसमध्येच रेमडेसीवीरचा पाचवा डोस दिला जाणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1313267143232942081?s=20

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीम इंडियाच्या खेळाडूला कोरोनाची लागण, दुसरी टी-२० पुढे ढकलली

News Desk

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

News Desk

जादा पैसे आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

News Desk