HW News Marathi
Covid-19

देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली | कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, देशात तिसरा लॉकडाऊन हा ४ मेपासून सुरू होणार आहे. सध्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अनेक नेत्यांची आज (२ मे) भेट घेतली आहे. पीटीआयने अशी माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमन यांच्याशी चर्चा केली असून अर्थखात्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या खात्यांशी चर्चा करणार आहे. लघु तसेच लघु आणि मध्यम उद्योगातील काही मोठ्या अधिकाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी बैठक घेणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. अर्थ मंत्रालय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांसमोर एक सविस्तर सादरीकरण करणार असून आपल्या वेगवेगळ्या योजनांचीही माहिती देणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

News Desk

“सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, फडणवीसांनी डिवचले

News Desk

राज्यात कोरोना चाचण्यांचा दर प्रति तपासणी ३०० रुपये कमी केला – राजेश टोपे

News Desk