HW News Marathi
महाराष्ट्र

अपयश लपण्यासाठी हा छाती बडवण्याचा प्रकार आहे…

मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपले अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते. आपलं अपयश लपवण्यासाठी काहीही केले नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी २००७ मध्ये अहवाल सादर केला होता. २००७ ते २०१४ दरम्यान केंद्र किवा राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यासंबंधीच पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही.

दरम्यान त्याच काळात २००७ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या संधीचा फायदा घेतला. २०१२ पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केलं,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून व्हिडिओ द्वारे ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंदोलनाचा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनात सरकारबद्दलचा असंतोष

swarit

‘जॉन्सन अँड जॉन्सन लशीला भारतात मान्यता’, 2 नाही तर घ्यावा लागणार कोरोना लशीचा एकच डोस!

News Desk

एससी-एसटी आरक्षण मुदत वाढीसाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन

News Desk