HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा ‘कोरोनामुक्त’ झालेल्यांचा आकडा मोठा

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मात्र, दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या तुलनेत दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (३ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १४ हजार ३४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात नवीन १६ हजार ८३५ रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत.

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही निश्चितच दिलासादायक आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण हे बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ५८ हजार १०८ रुग्ण विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत अर्थात हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा आता ७९.०३% इतका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट करत ही आकडेवारी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून राज्यात रेड व कंटेंनमेंट झोन वगळून ‘जिल्ह्यांतर्गत’ एसटी सेवा सुरु

News Desk

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ३१ डिसेंबर घरीच साजरा करा! – शंभूराज देसाई

Aprna

सीबीएसई-आयसीएसई बोर्डाकडून आज दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द

News Desk