मुंबई | विक्रोळी पुलावर मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ४ मुली गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या मुली मुंबईत पोलीस भरतीसाठी आल्या होत्या. झाल्यावर विक्रोळी स्थानकाकडे जाताना तरुणींना टाटा झेन गाडीने उडवले. या चारही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना विक्रोळी येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या चार तरुणी पुण्याच्या शिरुरमध्ये असलेल्या शिरोळे अकादमीच्या आहेत. काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी या तरुणींची नावे आहेत. यातील दीपाली काळेला जास्त दुखापत असल्याने तिला सायनच्या टिळक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर वाहन चालकाला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोटार गाडीचा चालकाचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. मोटार गाडी क्रमांक MH 04 JK 3261 च्या चालकाचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. या प्रकरणात मोटर गाडीचा चालक दोरगे यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मोटार गाडी चालक चालकावर गु .र .क्र. 160/18 कलम 279, 337, 338 भा. दं. वि. सह 184 मो .वा. का .अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.