HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

पुढच्या वर्षीही ‘वर्षा’ निवासस्थानी करणार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्री

मुंबई। देशभरात बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले असून येत्या ११ दिवस बाप्पाची धामधूम अशीच सुरू राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी सहपरिवार गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी पत्नी अमृता फडणवीस, मुलगी आणि कुटुंबियांसोबत मुख्यमंत्र्यांनी बाप्पाची आरती केली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजनदेखील सहकुटुंब उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यावरील पुराचे संकट दूर करो, पीडितांना दिलासा मिळण्यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. शिवाय, “पुढच्या वर्षीसुद्धा ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आपणच बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.”

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गणेश पर्व अत्यंत आनंदाचे पर्व आहे. देशात -विदेशात हा सण साजरा होतो. मात्रा मराठी माणूस जिथे असतो तिथे या सणाचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाला एवढीच प्रार्थना की सर्वांना आशीर्वाद द्यावा. महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी आणि पूर पीडितांना दिलासा मिळावा यासाठी प्रार्थना करतो, असे म्हणाले. बाप्पांचा आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाची बैठक सुरू, विधानसभा निवडणुकीची तारीख होणार निश्चित

News Desk

मनसे विधानसभा लढविणार, मनसेच्या एकमेव नगरसेवकाने दिले संकेत

News Desk

पंतप्रधान ‘हाऊडी मोदी’मध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार

News Desk