HW News Marathi
महाराष्ट्र

पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रविण दरेकरांचा आरोप

मुंबई | मुंबई बँकेच्या कारभारात कोणतीही अनियमितता नसून सरकारने राजकीय आकसातूनच ही चौकशी सुरु केली आहे, चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचा दावा भाजपचे नेते व बॅकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आज (१ ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मुंबई बॅंक तोटा प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारचा अहंकार यात जागा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी ६ मुद्द्यांची तपासणी लावली आहे हे खर असल्याचे ते म्हणाले आहेत. अनेक मुद्दे घेऊन मी विरोधी पक्षनेता म्हणून समोर येत आहे. प्रश्न मांडत आहे म्हणून पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न आहे. मी घाबरत नाही असेही दरेकरांनी ठामपणे सांगितले आहे.

“अकाऊंट एनपीएमध्ये गेली होती त्यामुळे तोटा होता मात्र आता सर्वांनी मेहनत घेऊन आता बँक नफ्यात आलीये.ज्यांच्या विश्वासावर बँक मोठी झाली त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे. खरं म्हणजे ही रुटीन तपासणी असल्याच ते म्हणाले. साखर कारखान्यांना दिलेले कर्ज कॉर्पोरेट लोन आहे. या लोन मुळे बँकेचा फायदा झालाय, एखादं दुसरं लोन थकलं असलं तरी सिक्युरिटी घेतलेली आहे. CBS प्रणाली बँकेत आहे. त्यामुळे तपशीलवार माहिती दिली जाईल”.

मराठा तरुणाच्या आत्महत्येवर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर मराठा तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला तर सरकारला आवरता येणार नाही.आरक्षण मुद्द्यावर जे जे शक्य आहे ते सरकारने करावं आश्वस्त करावं.उद्या जर याचं रूपांतर ठोक मोर्चात झालं तर ते आवरणं कठीण होईल“, असा इशारा दरेकरांनी यावेळी दिला.

“हाथरस प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. हाथरस असो किंवा कुठल्याही राज्यात अशा घटनांना पाठीशी घालण्याचा संबंध नाही. दुसऱ्या राज्यात झालेल्या घटनेचा बाऊ करत आहेत. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून अशी गत आहे. महाराष्ट्रातसुद्धा घटना घडत आहेत मात्र त्यावर सरकार शांत आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थच्या ट्विटबद्दल मला काहीच माहीत नाही ! रोहित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्याची प्रक्रिया घटनाबाह्य! – राज्यपाल

Aprna

पुढच्या ३-४ दिवसांत आकडा वेगाने वाढेल पण परिस्थिती नियंत्रणात असेल !

News Desk