HW News Marathi
व्हिडीओ

प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा ! १८ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येने संभाजीराजे भावूक

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाकडून संपूर्ण राज्यभरात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने SEBC प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणही देण्यात आहे. मात्र, नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मराठा समजाला मोठा धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली. आणि हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा आता कसा जीवावर बेततोय, पाहूया

नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे . विवेक राहाडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

संभाजीराजेंच्या भावनिक आवाहन, “माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत. एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावं, मरून जगावं” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!”

#MarathaReservation #SambhajiRajeChhatrapati #Maharashtra #MahaVikasAghadi #UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #VinayakMete #MarathaMorcha #SupremeCourt
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मिरी पंडित आणि हिंदुंच्या हत्येवरून Sanjay Raut यांनी भाजपवर साधला निशाण

News Desk

“मला आजही वाटतंय मीच आहे मुख्यमंत्री”, Devendra Fadnavis यांच्या विधानाने खळबळ

News Desk

महाराष्ट्रात निलंबित पण केंद्रात भरारी! फडणवीसांच्या ‘या’आमदाराची चर्चा…

News Desk