HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात निलंबित पण केंद्रात भरारी! फडणवीसांच्या ‘या’आमदाराची चर्चा…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे विश्‍वासू समजले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर नुकतीच निवड झाली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक राहिल्यानेच सातपुते यांना फडणवीस यांनी संधी दिल्याचे दिसत असून या निमित्ताने सातपुते यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी देण्यात येणार असून त्या दृष्टीने पक्षाकडून ही नवी टीम तयार करण्यात आली आहे.राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर एकूण ७ जणांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून आमदार सातपुते यांच्याबरोबर मधुकेश्‍वर देसाई यांना संधी मिळाली आहे. इतर उपाध्यक्षांमध्ये पश्‍चिम बंगालमधून अनुप कुमार साहा, बिहारमधून मनिष सिंह, ओडिशामधून अर्पिता अपरिाजिता बडजेना,उत्तरप्रदेशमधून अभिनव प्रकाश व उत्तराखंडमधून नेहा जोशी यांची निवड करण्यात आली आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली ही नवी टीम तयार करण्यात आली आहे.

#RamSatpute #PMModi #bjp #DevendraFadnavis #narendramodi #amitshah

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gulabrao Patil Shivsena | शिवसेनेने विद्यमान आमदारांनाच एबी फॉर्म दिले आहेत !

Gauri Tilekar

गर्दीपासून वाचण्यासाठी Ajit Pawar यांची ‘ही’ ट्रिक; लॉकडाऊनबाबतही केलं मोठं विधान

News Desk

पोलिसांच्या अपयशामुळे गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ? काय म्हणाले Ajit Pawar आणि Devendra Fadnavis

News Desk