HW News Marathi
राजकारण

 कडकनाथ कोंबडीपालन घोटाळा : पोलिसांकडून २ संस्थापकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई | कडकनाथ कोंबडीपालन घोटाळयाप्रकरणी महारयत ऍग्रो कंपनीच्या दोन संस्थापकांसह पाच जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच जणांपैकी पोलिसांनी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या फसवणुकीनंतर कंपनीचे सर्व बँक खाती गोठवितण्यात आली आहे. पोलिसांनच्या हाती या प्रकरणाची कागदपत्रे हाती लागली असून शेतकऱ्यांची ५०० कोटीची रुपयांची फसवणूक झाल्याचा कागदपत्रातून माहिती मिळाली आहे.

कडकनाथ संबंधीची कंपनी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप होत आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शेट्टी यांनी आपल्या विरोधात भर चौकात पुरावा दाखवावा, पुरावा दाखवता येणार नसेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी भर चौकात विष्ठा खावी, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

swarit

महाराष्ट्र आपली कर्मभूमी म्हणविणारे बाॅलीवूड कलाकार आता आहेत कुठे ?

News Desk

महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे

News Desk