HW News Marathi
Covid-19

HW Exclusive : अजित पवार मुख्यमंत्री होणार का ?

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील कालपर्यंत (२८ एप्रिल) कोरोना रुग्णांची संख्या संख्या ९ हजार ३१८ झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असून यामुळे राजकीय अस्थिरतेला सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या पेचप्रसंगी मुख्यमंत्री होतील, असे मसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे मसेज सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागेच कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आमदार म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती केली नाही. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, आणि मग अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार पुढे सुरू ठेवणार असल्याचे मसेजमध्ये सांगण्यात येत आहे. या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मसेजचा एच. डब्ल्यू.मराठी अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता एच. डब्ल्यू. मराठीने राजकीय विश्लेषक यांच्याशी बातचीत करून पडताळून पाहिली आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यात पूर्णपणे फेटाळून लावली | अतुल कुलकर्णी

अजित पवार मुख्यमंत्री होण्यासंदर्भात लोकमतचे जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांना प्रश्नविचारले असत ते म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यात त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे.” ते पुढे म्हणाले की, या शक्यते मागे काही अर्थ नाही. अजित पवार यांचा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा कुठेही प्रश्न येत नाही. कारण राज्यपालांची भेट घेऊन काल जो प्रस्ताव मंत्रिमंडळाने दिला आहे. यानंतर राज्यपालांना हा प्रस्ताव स्वीकारण अनिवार्य आहे. घटनात्मक तरतुदीनुसार, राज्यपाल हा प्रस्ताव येत्या काही दिवसा ते स्वीकारतील. राज्यपाल सध्या फक्त वेळकाढून नेहण्याचे धोरण आवलंबले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता कुठेही राहत नाही, असे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

राज्यातील राजकीय पेसप्रसंग फडणवीसांनी निर्माण केला | राजू परुळेकर

यासंदर्भात राजकीय विश्लेषक राजू परुळेकर म्हणाले, राज्यातील सध्याचा राजकीय पेचप्रसंग हा लष्करे देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केल्याचा त्यांनी आरोप एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. परुळेकर पुढे म्हटले, एखादा माणूस गटराच्या शेवटच्या तळाशी किती जावू शकतो, यांचे हे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर जी शक्यता वर्तवली जात आहे. तो अगदी दूरचा पर्याय असून शकतो. राज्यपालांनी जर उद्धव ठाकरेंची ठरलेल्या कालावधीत नियुक्ती केली नाही. तर शिवसेना आपले इतर पर्यात मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून वापरू शकते. ज्यात एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई या तिन्हांच्या नावा विचार मुख्यमंत्री पदासाठी होऊ शकतो, असे राजू परुळेकर म्हणतात. महाविकासआघाडीचे सरकार बनवण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे होती, असे म्हणत राजू परुळेकरांनी पुन्हा ही गोष्ट एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना अधोरेखित केली. यामुळे शिवसेनाचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी भाजपची सेने विभक्त झाली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना आजही त्यांच्यात आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांनी आमदार म्हणून नियुक्त केली नाही. तर घटनात्म तरतुदीनुसार उद्धव ठाकरे राजीनामा देऊन पुढील सहा महिन्यासाठी पुन्हा तेच मुख्यमंत्री राहतली, असे राजू परुळेकर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाल.

यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मसेजची सत्यता पडताळल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी कोणतीही शक्यात दिसून येत नाही. राज्यात सध्या जो राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होत. येत्या काही दिवसा सुटण्याची चिन्हे हे कालच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबत झालेल्या भेटीनंतर दिसून आल्याचे मत दोन्ही राजकीय विश्लेषकांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

News Desk

सोलापूरमध्ये ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवा!

News Desk

“माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की…”

News Desk