HW News Marathi
महाराष्ट्र

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींवर फाशी द्या, आठवले, राऊतांची मागणी!

मुंबई | उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीच मुलीवर सामुहिक बलात्काराची भयानक घटना घडली. त्या तरुणीचा काल (२९ सप्टेंबर) मृत्यू झाला. यावर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असे कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे, अशी खंत आठवलेंनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील त्या आरोपींवर फाशी व्हावी अशी मागणी केली आहे. संपूर्ण देशभरातून या प्रकरणाला विरोध केला जात आहे. आणि दुःख देखील व्यक्त केले जात आहे. तसेच, कॉंग्रेसने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली आहे. त्यामूळे आता उत्तरप्रदेशचे सरकार काय पाऊल उचलणार, आरोपींना गंभीर शिक्षा करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात ‘नो एन्ट्री’, शरद पवारांची भूमिका!

News Desk

रेल्वेचे आरक्षणासाठी पोस्टपेड पर्याय

News Desk

बीडमध्ये राजकीय वातावरण तापले, शिवसंग्रामचे १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

News Desk