मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. मात्र तपास करणाऱ्या संस्थांकडून सेलिब्रेटी व हाय प्रोफेशनल अशाच काही मोजक्या महिलांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. परंतु ड्रग्जप्रकरणी तीन-चार सेलिब्रेटी किंवा हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात ते नष्ट करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या.
राज्यात जसे आम्ही तंबाखू मुक्त अभियान राबवत आहोत तसेच केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान सुरु करण्याची मोठी गरज आहे. महाविद्यालयीन जीवनापासून मी तंबाखू विरोधात काम करत आले आहे. व्यसनांचे दुष्ट्चक्र हे जडसें उखडना जरुरी है, त्यामुळे व्यसनांना समाजात जागाच असू नये असे माझे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामूळे या प्रकरणात आणखी कोण अडकणार, काय समोर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.