HW News Marathi
महाराष्ट्र

नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी !

मुंबई | कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागाने यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत .त्यामुळे या वर्षी गरबा आणि दांडिया खेळता येणार नाही. इतर सणांप्रमाणे नवरात्रोत्सवही कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली :

– नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित

– सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवनागी घेणे आवश्यक

नवरात्रोत्सवासाठी मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

– देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट , घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादित ठेवावी

गरबा, दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावेत

– आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.

– रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा.

– रावण दहनाकरिता किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची काळजी घ्यावी

– देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

– देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

– मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार -गृहमंत्री

News Desk

फेसबुक कडून तालिबानशी संबंधित माहिती हटवण्यास सुरुवात!

News Desk

“दरवाढ करणे गरजेचे आहे”, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk