HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक, येत्या ५ सप्टेंबरला उमदेवारांची यादी तयार होणार

नवी दिल्ली | आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक आज (२९ ऑगस्ट) बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघांसाठी खलबते करण्यात आली आहेत. या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस येत्या ५ सप्टेंबरला छाननी समितीची बैठक होणार असून यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सहा जणांची एक समिती नेमली आहे. या समितीची प्रमुख पदाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविली आहे. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रटरी मलिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, नेते के. सी. पडवी यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्रिपद दिले तरच वंचित आघाडी काँग्रेससोबत !

News Desk

ओवैसींच्या सुचनेप्रमाणे वंचितशी आघाडी तोडण्याचा निर्णय | इम्तियाज जलील

News Desk

 काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk