HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

मुंबई | राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढत आहेत. खाजगी व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांही या लढाईत योगदान देत आहेत. ‘मुख्यमंत्री सहायता निधी’च्या माध्यमातून या लढाईसाठी आर्थिक बळ एकत्रित केले जात आहे. या निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जाणीव, कर्तव्याच्या भावनेतून राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मे महिन्याच्या वेतनातून या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश काढण्यात यावेत, अशी विनंती कर्मचारी महासंघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी आज दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

News Desk

शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक, आरोपींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार !

News Desk

“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की…”; राज्य सरकारला मनसेचा सवाल

News Desk