मुंबई | काल (२८ सप्टेंबर) रात्री मुंबईत आमदार निवास बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी आली आणि यंत्रणांची पळापळ सुरू झाली. मात्र, तपासाअंती ही अफवाच असल्याचे उघड झाले. का रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबईतील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवासाला अज्ञात क्रमांकावरून बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली.
या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. यानंतर श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या सर्वांना त्वरित बाहेर काढून इमारत रिकामी केली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर ही दिशाभूल करणारा कॉल असल्याची माहिती उघड झाली.पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तिचा नंबर ट्रेस झाला आहे, आणि तपास सुरू आहे.
Maharashtra: Mumbai police evacuated people from MLA hostel after receiving a bomb threat call.
Police say,"Around 150 people were there in building. We've checked thoroughly & have not found any explosive material. The phone number has been traced,further action will be taken." pic.twitter.com/7ZVCp3nGBj
— ANI (@ANI) September 28, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.