HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“मनसेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, मनसेच्या ‘त्या’ आरोपाला राष्ट्रवादीचे उत्तर  

मुंबई | राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मनसेला सुनावले आहे.

“सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणारे मनसेचे पदाधिकारी हे कधीच सार्वजनिक जबाबदारी समजू शकत नाही. सार्वजनिक जीवनामध्ये मालमत्तेची तोडफोड करणे हा एक भाग झाला. आणि लोकांच्या जीवनाची सुरक्षितता करणे, त्यासंदर्भात उपाययोजना करणे, खबरदारी करणे यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. लोकांच्या हिताचं संरक्षण करावं लागतं, हे मनसेचे पदाधिकारी कधी समजू शकत नाहीत. आज मनसेने मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर टीका केली की, हे अधिवेशन घ्यायचे नाही म्हणून लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत”.

“कुठेतरी खोटी आकडेवारी दाखवली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यायचे नसल्याने लॉकडाऊनची भीती दाखवली जात असल्याचे मनसे नेत्याचे वक्तव्य योग्य नाही. महाविकासआघाडी सरकार जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मनसेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, अशी विनंती महेश तपासे यांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना केली आहे.

काय म्हणाले होते संदीप देशपांडे?

“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Related posts

मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवली – परमबीर सिंह 

News Desk

मुंबईत उभारणार ‘मुंबई आय’

rasika shinde

राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, राणेंची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका

News Desk