HW News Marathi
Covid-19

राज्यातील हॉटस्पॉट ठिकाणांचा लॉकडाऊन वाढवावा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली | देशातील दुसरे लॉकडाऊन संपण्यास अवघा एक आठवडा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ एप्रिल) देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोब व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीत देशातील राज्यांची आर्थिक स्थिती पाहता, अर्थव्यवस्थेला चालना देणे गरजेचे असल्याचे मोदींनी म्हटले. पण, नागरिकांचे आरोग्य आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईला प्राधान्य असल्याचेही मोदींनी म्हटले. यावेळी, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. यात, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, प.बंगाल आणि ओडिशा येथील मुख्यमंत्री हॉटस्पॉट विभागातील लॉकडाऊन वाढविण्यावर असल्याची माहिती मिळाली आहे.

देशभरातील अनेक राज्यात शेतीविषयक कामे आणि दुकानविक्रेत्यांची दुकाने खुली ठेवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या शहरांसह ज्याठिकाणी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. त्या ठिकाणचा लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच घोषणाही करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठविण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२६ एप्रिल) फेसबुक लाईव्हमध्ये केला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार ! 

News Desk

५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’! – दिलीप वळसे पाटील

Aprna

मुख्यमंत्र्यांची इंडियन ब्रॉडकास्टर्ससोबत बैठक, सावधानता बाळगून निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार

News Desk