HW News Marathi
Covid-19

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोनाने जनजीवन विस्कळीत केले आहे. सर्वसामान्य लोकांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण होण्याने प्रणाण वाढत आहे. आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांची कोरोनावर लागण झाली आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे गेल्या आठवड्यात एक दिवस मुंबईत होते. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेकजण या मिटींग उपस्थितीत होते. त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री आदित्य ठाकरेंपाठोपाठ रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण

News Desk

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, सरकारकडून नवे नियम जारी

News Desk

मुख्यमंत्री आज ठाण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार

News Desk