HW News Marathi
Covid-19

दबावाखाली न येता वाधवान कुटुंबियांना पत्र दिल्याची अमिताभ गुप्ता यांची कबुली

मुंबई | कोरोना प्रादूर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत व योग्य ती शासकीय नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकद्वारे संवाद साधताना स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीसदल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलीसांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे.

कोरोना विशेष कक्ष व नोडल अधिकारी

कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

वाधवान प्रकरण

वाधवान प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, आज सातारा पोलीस अधीक्षकांनी धिरज व कपिल वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले. तसेच त्यांचे कुटुंबातील इतर लोकांना होम काँरंटाइन केले आहे. या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सौनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल.

या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे तसेच या चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल.

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कसलेही राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

https://www.facebook.com/AnilDeshmukhNCP/videos/3116524015066844/?t=4

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर! देशात ऑगस्टपासून मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ

News Desk

ठाणे, नवी मुंबई आणि वसईत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk

पीएम केअर्स फंडाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk