HW News Marathi
Covid-19

कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर | कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. यापूर्वी कोल्हापुरातील तीन आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोल्हापुरात सामान्य लोकांना तर कोरोनाची लागण होताना दिसत असताना आता आमदार आणि खासदारांना देखील कोरोनाची बाधा होण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय सभा थांबवा, जमत नसेल तर आम्हाला सांगा ! कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं

News Desk

काँग्रेस एकाच जागेवर विधानपरिषद निवडणूक लढणार, ‘या’ उमेदवाराचे नाव मागे

News Desk

आम्ही पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करून द्या, राजेश टोपेंचं केंद्राला कळकळीची विनंती

News Desk