मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची काल (२६ सप्टेंबर) गुप्त भेट झाली होती. दरम्यान, सुरुवातीला संजय राऊत यांनी ही भेट झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता अखेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं कबुल क केल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती.
सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं. मात्र, आता स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली आहे. “मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यातील २ वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
I met Devendra Fadnavis yesterday to discuss certain issues. He is a former CM. Also, he's the leader of opposition in Maharashtra & #BiharPolls-in charge of BJP. There can be ideological differences but we are not enemies. CM was aware about our meeting: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/6OdXCbWWMt
— ANI (@ANI) September 27, 2020
“मुळात माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट गुप्त नव्हती. आम्ही जाहीरपणे भेटलो. मी जेव्हा सामनासाठी शरद पवार यांची मुलखात घेतली, तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. आम्ही सामानाच्या मुलाखतीसाठी भेटलो. मी राहुल गांधी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यतील 2 वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
दरम्यान, काल (२६ सप्टेंबर) शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल २ तास ही भेट झाली होती. आता संजय राऊत यांनी दिलेल्या कबुली नंतर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.