HW News Marathi
Covid-19

कदाचित मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो | आरोग्यमंत्री

मुंबई | “मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता कदाचित या दोन्ही शहरांतील लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो”, अशी शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना वर्तवली आहे. देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित ३ मेनंतर संपेल मात्र तासागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असणाऱ्या मुंबई आणि पुण्यातला लॉकडाऊन आणखी १५ दिवस म्हणजेच १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता आरोग्यमंत्र्यांकडून या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ही केवळ एक शक्यता असून असा कोणताही निर्णय अद्याप सरकारकडून घेण्यात आलेला नाही, हे लक्षात घ्यावे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, तो नियंत्रणात आणता यावा यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, जर प्रादुर्भाव कमीच होत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसेल, असेही राजेश टोपेंनी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितल्याची माहिती आहे. दाटीवाटीच्या परिसरांमुळे सध्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या शहरांतील कंटेंटमेंट झोनमध्ये काय स्थिती आहे ते देखील पाहून कदाचित ३ मेनंतर राज्यातील या कंटेंटमेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढू शकतो, अशीही शक्यता राजेश टोपेंनी या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केल्याची माहिती मिळते.

गेल्या महिन्याभरात मुंबई-पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्थिती जर अशीच राहिली तर मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढू शकतो, असे राजेश टोपेंनी या वृत्तसंस्थेशी बोलताना म्ह्टले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून ही शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर आता सर्वत्र विविध चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

News Desk

Dr. Avinash Bhondwe HW Exclusive : डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत ?

News Desk

महाराष्ट्राला रोज ८ लाख लसींची गरज पण मिळतायत २५ हजार, आरोग्यमंत्र्यांची खंत

News Desk