HW News Marathi
राजकारण

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येत्या ५० वर्षात सत्तेत रहाण्याचे स्वप्न पहा असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला. शहा रविवारी गाझियाबाद येथील सभेत बोलत होते. राजकारणातील विजयाचा संकल्प केवळ पाच दहा वर्षांपूरता ठेऊ नका तर अगामी ५० वर्षात भाजपलाच सत्तेत ठेवण्याचा संकल्प करा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने सत्ता टिकवली तसेच सत्तेत टिकून रहाण्यासाठी काम करा असे आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

अमित शहा पुढे म्हणाले, ‘सत्तेत आल्यापासून भाजपने असे कोणतेही काम केलेले नाही ज्यामुळे पक्षातील नेत्यांना अपमान सहन करावा लागेल. सध्या सर्वांनी फक्त निवडणूकीपर्यंतचा विचार न करता देशाच्या विकासासाठी जीव ओतून काम करण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या कामामुळे नेहमीच सर्वजण ताठ मानेने काम करु शकतात असेही शहा यावेळी बोलताना म्हणाले.’

 

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार; जिल्हाधिकारी निधी चौधरींची माहिती

Aprna

“पहाटेच्या शपथविधीमुळे फायदा एकच झाला…”, शरद पवारांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Aprna

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk
महाराष्ट्र

साखरेच्या प्रश्नावरून शरद पवार घेणार मोदींची भेट

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साखरेच्या प्रश्नावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन साखर उत्पादकांच्या विविध समस्या त्यांच्या समोर मांडणार आहेत.

सध्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून शेतकऱ्यांपासून सर्वच जण अडचणीत आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूर दौऱ्यावर पत्रकार परिषदेत बोलत होते.

साखर उत्पादनासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही पाठवले होते. यंदा देशात साखरेचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणं गरजेचं असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्राने मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली. ६० टक्के साखरेवर सेस लावून रक्कम उत्पादकांनी द्यावी तसेच पेट्रोलप्रमाणे इथेनॉलचे दरही वाढले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.

Related posts

छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या!

Aprna

HW Exclusive: विमाच न घेतलेल्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला !

News Desk

काश्मीरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या

News Desk