HW News Marathi
मुंबई

अंगावर झाड पडून एकाचा दुर्दैवी अंत

मुंबई | अंगावर झाड पडल्याने गुरुवारी दादर मध्ये ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या व्यक्तीचे नाव दिनेश सांगळे असून सांगळे दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व येथे असता अचानक झाड कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

अचानक झाड कोसळल्यानंतर सांगळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार घडल्यानंतर परिसराती लोकांनी सांगळेंना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी पावणे चारच्या सुमारास मुंबई मराठी ग्रंथआलय परिसारात घडली. दिनेश सांगळे हे नायगाव कामगार वसाहतीत रहात होते.

मुंबई मराठी ग्रंथालयाला महापालिका एफ दक्षिण विभागाकडून ६ एप्रिल रोजी सुचित करण्यात आले होते. की, तुमच्या आवारातील झाडांची छाटणी करण्यासाठी पालिकेला अॅपलिकेश द्यावे. तर पालिका या झाडाची छाटणी करले. त्यांनी पालिकेकडे झाडांची छाटणी करण्याची मागणी केली नसल्यामुळे हे झाड पडल्याचे महापालिका एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी एच डब्लू मराठीशी बोलताना सांगितले.

महापालिका १ एप्रिल पासून पाऊसापुर्वी प्रत्येक विभागात झाडांची पाहणी करत आहे. ज्या झाडांची छाटणी करणे गरजेची वाटते, त्यांची छाटणी देखील पालिकेकडून करण्यात येते. गुरुवारी कोसळलेले हे झाड मराठी ग्रंथ संग्रहालाय परिसरात होते. खासगी जागेवरील झाडांची छाटणी करण्यासाठी त्या खासगी जागेने पालिकेला अॅपलिकेशन दिले तरचं त्या झाडांची छाटणी पालिका कर्मचा-यांना करता येते. पालिकेने मराठी ग्रंथ संग्रहालायाला सांगितले होते की, तुम्ही पालिकेला अॅपलिकेश करा आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. कारण या झाडाला छाटणीची गरज आहे. परंतु त्यांनी पालिकेकडे अॅपलीकेश दिले नाही, असे एफ दक्षिण वॉर्डचे सहाय्यक उद्यान अधिक्षक संदीप राऊत यांनी सांगतले.

  • गुलमोहरचे झाड कोसळून झाला सांगळेंचा मृत्यू

दिनेश सांगळे या व्यक्तीवर गुरुवारी कोसळलेले झाड हे गुलमोहरचे होते. हे झाड २० ते २५ वर्ष जुने होते. या झाडाला आतून वाळवी लागली होती. त्यामुळे हे झाड पडले. गुलमोहर हे झाड भहरले की खूप सुंदर दिसते. पण, भारतातील वातावरण या झाडासाठी पोषक नाही. हे झाड मॉरेशिस मधून आणलेले झाड आहे. पालिका आता गुलमोहरची झाडे लावत नसल्याचे सहाय्यक उद्यान अधिक्षक संदीप राऊत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुढीपाडव्याच्या आधी राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk

उंदीर घोटाळ्यानंतर चहा घोटाळा उघडकीस

News Desk