HW News Marathi
मुंबई

उंदीर घोटाळ्यानंतर चहा घोटाळा उघडकीस

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मंत्रालयातील ‘उंदीर घोटाळा’ उघडकीस आणला होता. हा घोटाळा ताजा असतानाच मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना केला आहे.

संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयात २०१७-२०१८ या चालू वर्षात चहा आणि अल्पोपहारवर ३ कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. याचा अर्थ असा होतो की, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एका दिवसाला १८,५०० कप चहा प्यायला जातो असा अदांज आहे. हे कोणालाही न पटणार नाही. तसेच मुख्यमंत्री अशी कोणत्या प्रकराची चहा पितात, चहा पाहुण्यांना पाजतात, त्यात काय टाकले जाते ? तेच कळत नाही, असा संजय निरुपम यांनी केला आहे.

२०१५-२०१६ मध्ये ५७ लाख ९९ हजार १५६ रुपये चहावर खर्च झाले. २०१६-२०१७ मध्ये एक कोटी २० लाख ९२ हजार ९७२ रुपयावर खर्च पोहचला होता. म्हणजे दरवर्षी चहा आणि अल्पोपहारावर दुपटीहून अधिक वाढ होत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी सरकारवर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

News Desk

साईच्या मुलांनी हसत खेळत अभ्यास करण्याचे धडे गिरवले

swarit

तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न

News Desk