HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला फक्त जनताच प्रश्न विचारु शकते | मुख्यमंत्री फडणवीस

परभणी | सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करून राजकारण करणा-यांनो तुम्ही ५० वर्षात चांगले वागला असतात तर तुमच्यावर आज ही वेळ आली असती का? साठ वर्षांत तुम्ही काय केले आणि आम्ही काय केले याचा हिशेब आकडेवारीनुसार सांगू शकतो. आम्हाला जनताच प्रश्न विचारु शकते आणि आम्ही जनतेशीच उत्तरदायी आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.

परभणीच्या स्टेडियम मैदानावर समाधान शिबिराचा समारोप व राष्ट्रीय महामार्गाचे ई भूमिपूजन कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम पार पडला त्यावेळी फडणवीस बोलत होते. खासदार संजय जाधव यांनी यापूर्वीच समाधान शिबिरावर बहिष्कार घोषित केल्याने शिवसेनेच्यावतीने कोणीही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहीले नव्हते. कार्यक्रम शासकीय असल्याचे सांगितले असतानाही मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण करत विरोधकांवर टीका केली.

यापूर्वीचे सरकार सीमेवर लढणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये द्यायचे. आम्ही आता संबंधित कुटुंबास २५ लाख रुपये आणि पाच एकर जमीन देतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमात पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखा धनादेशही मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार मोहन फड, तानाजी मुटकुळे, रामराव वडकुते, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, महापौर मीनाताई वरपुडकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी आमदार विजय गव्हाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे आदींसह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय मेरिटाइमच्या सुरक्षततेसाठी भारतीय नौदल कटिबद्ध – व्हाईस ऍडमिरल गिरीश लुथरा

News Desk

बदलत्या परिस्थितीस सामोरी जाणारी आरोग्य व्यवस्था निर्मितीस प्राधान्य द्यावे! – आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे

Aprna

तुकाराम मुंढे यांची कोरोनाची लागण झाल्यानंतर पहिली पोस्ट

News Desk