HW News Marathi
महाराष्ट्र

भारतीय मेरिटाइमच्या सुरक्षततेसाठी भारतीय नौदल कटिबद्ध – व्हाईस ऍडमिरल गिरीश लुथरा

मुंबई – ५४ व्या राष्ट्रीय जहाजदिनानिमित्त कार्यक्रमाचा सांगता समारोह भारतीय नौदलाचे व्हाईस ऍडमिरल गिरीश लुथरा ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेन्टर येथे पार पडला, या कार्यक्रमाला लक्षमी वेंकटाचलन,माजी जहाज महासंचालक मालिनीशंकर,महासंचालक जहाज,कॅप्टन अनुपकुमारशर्मा,अध्यक्ष

वकार्यकारी संचालक ,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचेबी बी सिंन्हा,अध्यक्ष, राष्ट्रीय जहाज दिन समारोह समिती तथासंचालक शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या प्रमुख उपस्थितीतपार पडला.

देशाच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय मरिटाईम उद्योगाचे खूप मोठे योगदान आहे.जागतिक व्यवसाय, आयात-निर्यात ह्या बाबी मरिटाइमउद्योगांवर अवलंबून आहेत.आपल्या देशातील उद्योजकांनी पुढीलकाळातील आव्हाने, तंत्रज्ञानाचा होणारा वापर, निर्मिती क्षेत्रात होणारेअनेक बदल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्यापार करायला हवा. मरिटाइम व्यापार करताना सागरी सुरक्षितता, नियमांचे पालनव्हायला हवे, असे देखील लुथरा म्हणाले.ह्या वेळी जहाज संचालनालयाच्या माजी महासंचालिका लक्ष्मी वैकटचल्लम यांनी देखील भाषणात अनेक महत्वाचे मुद्देमांडले.

भारताचा सागरमाला प्रकल्प हा खूप महत्वाकांक्षी असून,हादेशाच्या आर्थिक विकासासाठी योगदान देणारा ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या. मेकइन इंडिया, स्टार्टअप इंडियाच्या योगदानाने नवंतंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक आणखी सुरळीत व्हावी व त्याच बरोबर रस्ते , लोहमार्ग व जल वाहतूक ह्यांनी एकत्रित पणे करणेदेशाच्या हिताचे ठरेल असे देखील त्यांनी ह्यावेळी सांगितले.राष्ट्रीय मरिटाइम दिना निमित्त दिला जाणारा सर्वोच्च ‘वरूण पुरस्कार’ ह्या वर्षी कॅप्टन पुरूषोत्तम बर्वे ह्यांना देण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Teachers Day | शिक्षक दिनी ज्ञानदाते रस्त्यावर

News Desk

राज्यात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा

News Desk

“सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावं”, भाजपची टीका!

News Desk