मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन आहे. या कोरोनाचा परिणाम पूर्णपणे देशाच्या आर्थिक तिजोरीवर झाला आहे. तो कसा सोडवावा याचे पत्रातून उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. ‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी या निष्ठून सांगितले आहे.
तसेच, काही हॉटेल्स, पोळी भाजी केंद्र आहेत जिथे स्वस्त दरात राईसप्लेट मिळते. या छोट्या खानावळींची संख्या ही जास्त आहे. तसेच, यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामूळे सरकारने वास्तवाचा विचार करत हळूहळू आर्थिक स्थैर्य कसे येईल याचा विचार केला पाहिजे. खानावळी जरी सुरु केल्या तरी लोकांना नीट अंतर ठेवून जेवण देण्याची जबाबदारी ही प्रत्येक मालकाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी पत्रातून सूचवले आहे.
राज ठाकरेंच्या पत्रातील महत्वाचे मुद्दे :
राज्याचा महसूल वाढवण्यासाठी छोटी हॉटेल्स आणि पोळी भाजी केंद्र आणि वाईन्स शॉप्स उघडे ठेवण्याचा सल्ला.
सोशल डिस्टनसिंग आणि खबरदारी म्हणून इतर काळजी घेऊन या गोष्टी सुरू ठेवल्या तर महसूल वाढवता येईल असा सल्ला.
35 दिवसापासून लॉकडाऊन असल्याने राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला असून कोरोनाशी लढण्यासाठी हे गरजेचं आहे असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
दारू पिण्याऱ्यांसाठी न्हवे तर महसूल वाढवण्यासाठी वाईन शॉप्स खुले करा.
महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आवाहन.#CoronaVirusInMaharashtra #EconomicCrisis #FightAgainstCovid19 #RevenueGenerationForState #Economics #लढाकोरोनाशी @CMOMaharashtra pic.twitter.com/Fvx3N2hXYW
— Raj Thackeray (@RajThackeray) April 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.