HW News Marathi
महाराष्ट्र

बबड्याची आई अर्थात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

मुंबई | सरकारने मालिकेच्या, चित्रपटांच्या शुटींगला परवानगी दिली खरी. मात्र, ज्यांचा भीती होती तेच होण्यास सुरुवात झाली.झी मराठी वाहिनीवरील अगं बाई सासूबाई मालिकेतील बबड्याची आई अर्थात निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत तब्येत ठीक असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होते. येथील सेटवरील २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याच मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे साताऱ्यात निधन झाले. तसेच, अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबातील काही जणांना देखील कोरोना झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पुत्र पार्थ पवारांची ‘ही’ प्रतिक्रिया…

News Desk

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!

News Desk

फडणवीसांनी स्वत:ची नेमणूक विशेष अधिकारी म्हणून करावी…! – नवाब मलिक

Aprna