नवी दिल्ली | काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने भाजपवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘भाजप हे आंबेडकरी विचार धारेला विरोध करणारे सरकार आहे. भाजपने दलित आणि मागासलेल्या वर्गासाठी कोणतेही काम केले नाही. उलट सरकार हे दलित विरोधी कारवाई करतेय. त्यामुळे भाजप कधीही आंबेडकरी विचार धाराचा अवलंब करुच शकत नाही.’ अशा शब्दात काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन भाजवर टीका केली आहे.
The Modi Govt has no concern for Dalits or the backward sections of the society. Mere lip-service is what they think will make up for their anti-Dalit mindset. Therefore, the BJP can never appropriate Babasaheb. #AmbedkarJayanti https://t.co/vhdd3pRpoV
— Congress (@INCIndia) April 14, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रफित द्वारे जयंती निमित्ताने अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी यांनी रात्री पासून गर्दी केली आहे. देशभरात आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.