HW News Marathi
देश / विदेश

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

सोलापूर | इंदापूरचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन बांधकाम वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.खरंतर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपवळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली होती. तर आज (२२ एप्रिल) सोलापूरच्या पालकमंत्री पदावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या ४ महिन्यांत दत्तात्रय भरणे हे सोलापूरचे तिसरे पालकमंत्री आहेत. त्याचप्रमाणे, सोलापूर जिल्ह्यात कोरोना व सारी या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे नवनियुक्त दत्तात्रय भरणे यांच्या समोर आता मोठे आव्हान असणार आहे.

 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘न खाउँगा, न खाने दूँगा’,चे काय झाले? राहुल गांधीची मोदींवर टीका

swarit

इस्रोकडून तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीभोवतीच्या कक्षेत केले स्थापित

Aprna

व्यंकय्या नायडुंनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

News Desk