HW News Marathi
महाराष्ट्र

जिम, रेस्टॉरंट सुरू करण्याची आता रोहित पवारांचीही मागणी!

मुंबई |राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ रोहित पवारांनी ही मागणी केली आहे.

“कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता हॉटेल, जिम, क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केले आहे.

 

दरम्यान, मिशन बिगीन अंतर्गत राज्यात अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व नियमांचे पालन करून उद्योगव्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच सरकारी आणि खासगी अस्थापनाही सुरू केल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. शिवाय हॉटेल्समधून पार्सल सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिम आणि रेस्टॉरंट चालकांनीही आपली मागणी पुढे केली असून त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून याला पाठिंबा मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत तर स्वागतच”

News Desk

दहावीच्या निकालाच्या दोन्हीही वेबसाईट डाऊन..!

News Desk

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’, चर्चा तर होणारच!

News Desk