नवी दिल्ली | पॅरा ऑलिम्पिकमधील भारताला रौप्य पदक मिळवून देणारी महिला अॅथलिट दीपा मलिक आणि आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ खेळात सुवर्ण पदकाची कमाई करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांना ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. तर क्रिेकेटपटू रवींद्र जाडेजा आणि पूनम यादव यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. निवड समितीनं दोन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.
तसेच द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी या विविध पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर ते सर्व पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांची नावे
- राजीव गांधी खेल रत्न – बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)
- द्रोणाचार्य पुरस्कार – विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट)
- जीवनगौरव पुरस्कार – मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)
- अर्जुन पुरस्कार – तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)
- ध्यानचंद पुरस्कार – मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.