HW News Marathi
क्रीडा

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची निवड

मुंबई | भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर संघाला नवे प्रशिक्षक मिळाले आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रमेश पोवारची तातडीने अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड कायमस्वरूपाची नसून हंगामी स्वरूपाची आहे.

कायमस्वरूपी प्रशिक्षकाची निवड होईपर्यंत रमेश पोवारला या पदाचा भार सांभाळायचा आहे असे बीसीसीआयने स्पष्ट केले. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी याआधी बडोदा संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू तुषार आरोठे यांच्याकडे होती. परंतु त्यांच्यात आणि खेळाडूंमध्ये काही मतभेद झाल्याने त्यांनी हे पद सोडले. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर खेळाडू समाधानी नव्हते. हीच परिस्थिती बघता बीसीसीआयने त्यांना पद सोडण्यास भाग पाडल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आता रिक्त पद भरून काढण्यासाठी पोवार यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल पोवार यांनी आनंद व्यक्त केला असून महिला क्रिकेट संघाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षणासोबत खेळालाही महत्व द्या- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

News Desk

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप

swarit