HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटलींवर उपचार सुरू असलेल्या एस्म रुग्णालयामध्ये आग

नवी दिल्ली | दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. शॉक सर्किटमुळे एम्स हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्याच्या माहितीनुसार अरुण जेटली ज्या मजल्यावर आहेत तिथे ही आग पोहचली नाही. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घडामोडींना वेग ! अजित पवार, जयंत पाटलांसह शरद पवारांची दिल्लीत तातडीची बैठक

News Desk

अबू सालेमला सप्टेंबरमध्ये शिक्षा

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट…

News Desk