HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तान सैन्याकडून काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये आज (१७ ऑगस्ट) सकाळी सीमा रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारीत एक भारतीय जवान शहीद झाला. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत जवान लान्स नायक संदीप थापा (वय ३५) शहीद झाले. थापा हे देहरादूनचे असून १५ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल १२ दिवसांनानंतर आज (१८ ऑगस्ट) २जी इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून फोन देखील सुरू झाले आहे. तर जम्मू-काश्मीरमधील शाळा-कॉलेज सोमवारपासून (१९ ऑगस्ट) सुरू होणार आहेत. अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही सुब्रमण्यम यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या जम्मू, सम्बा, कथुआ आणि उधमपूर येथील २जी इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यात परिस्थिती सर्वसामान्य असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेबाहेरील स्वच्छता मोहिमेवरून हेमा मालिनी ट्रोल, ‘हे’ आहे कारण

News Desk

HW Exclusive | आता लातूर ‘कोरोना’मुक्त, समाधान वाटते !

News Desk

मोदींच्या लेह येथील रुग्णालयाच्या भेटीवर लष्कराने केला खुलासा

News Desk