HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या लेह येथील रुग्णालयाच्या भेटीवर लष्कराने केला खुलासा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (३जुलै) अचानक लेह, लडाखमध्ये जाऊन तिथल्या जवानांचे मनोधैर्य वाढवले. भारत चीन दरम्यान सुरू असलेल्या या तणावात जवानांना मानसिक मनोधैर्य देण्यासाठी भेट दिली. यावेळी त्यांनी जवानांना तुमच्या शौर्याची जाण संपूर्ण देशाला आहे असा विश्वासही त्यांना दिला. इतकेच नाही तर गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांचीही त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. मात्र सोशल मीडियावर या भेटीवरुनच मोदींना आणि भाजपाला ट्रोल केले जाऊ लागले. अनेक चर्चा सुरू झाल्या. दिखावा करण्यासाठी हे रुग्णालय उभे केले गेले अशा प्रतिक्रिया यायला लागल्या.

यानंतर आता खुद्द लष्कराने पत्रक काढून यावर खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लडाख येथील रुग्णालयात ३ जुलैला आले होते. मात्र सोशल मीडियावर यावरुन काही टीका होताना दिसते आहे. ही बाब अत्यंत दु्र्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे काही आरोप करण्यात येत आहेत ते दु्र्दैवी आहेत असे लष्कराने म्हटले आहे. त्यामुळे लष्कराने दिलेल्या या खुलास्यावरून लोकं करत असलेल्या टीका आता तरी थांबतील असेच म्हणावे लागेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझ्या मृत्यूची जबाबदारी सीबीआय घेणार का ?’

Gauri Tilekar

महान एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती

Aprna

#Coronavirus : आयकर, जीएसटी परतावा भरण्याची मुदत ३० जून, अर्थमंत्र्यांची घोषणा

swarit