HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ गंगाधर पानतावणेंचे स्मारक उभारणार | आठवले

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

त्यासाठी दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांची कन्या नंदिता यांच्यासह मान्यवरांना घेऊन दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे फाउंडेशन नावाने ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना करून दिवंगत पानतावणे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद मध्ये शासनाने जमीन द्यावी यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी दिले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रिपाइं आणि परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित आदरांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.

यावेळी विचारमंचावर भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ ऋषिकेश कांबळे, डॉ रोहिदास वाघमारे, सुहास सोनवणे, दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांच्या कन्या नंदिता अवसरमल तसेच केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, भुपेश थुलकर, काकासाहेब खंबाळकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड, डॉ प्रीतिष जळगावकर, बि के बर्वे, आशाताई लांडगे, फुलाबाई सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गौतम सोनवणे यांनी केले.

दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनानुसार परिवर्तन साहित्य महामंडळ चालत होते. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते.त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले.त्यांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभले. अनेक साहित्यिक विचारवंत पत्रकार संपादक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून शिवशक्ती भीमशक्ती युतीचा निर्णय आपण घेतला. दिवंगत डॉ गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श नियतकालिकातून आंबेडकरी विचारांचा प्रचार केला आंबेडकरी विचारांचे साहित्यिक घडविले. मला ही त्यांचा आशीर्वाद मिळाला होता असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भीमा कोरेगाव : संबंधित पुरावे कार्यकर्त्यांच्या लॅपटॉपमध्ये मुद्दाम पेरल्याचा संशय

News Desk

तर मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन – बच्चू कडू

News Desk

राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनींचं नुकसान, ८१ टक्के पंचनामे पूर्ण विजय वडेट्टीवार यांची माहिती!

News Desk
महाराष्ट्र

छगन भुजबळांचा पाय आणखीनच खोलात

News Desk

नाशिक | माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना नाशिक मर्चंट बँकेने नोटीस पाठवली आहे. बँकेने भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीने ४ कोटी ३४ लाख रुपये कर्ज घेतले होते. ठरलेल्या मुदतीत न दिल्याने बँकेने नोटीस पाठवले असून ६० दिवसात कर्जफेड न केल्यास बँकेकडून कारवाई करण्यात येईल.

नाशिक मर्चंट बँकेने नाशिकच्या स्थानिक वृत्तपत्रात ही नोटीस प्रसिद्ध करुन या कंपनीसोबत कोणताही करार करुन नये असे नमूद करण्यात आले. छगन भुजबळ यांच्या कंपनीने १ ऑक्टोबर २०१७ पासून थकबाकी शल्लक आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गेल्या दोन वर्षापासून तुरुंगात असून सुटकेसाठी धडपड करत आहेत. पण, भुजबळ कुटुंबियांच्या अडचणी कमी होण्या ऐवजी वाढच होत आहे.

Related posts

“गृहमंत्र्यांच्या या कारनाम्याबाबत शरद पवारांनाही माहिती होती”, परमबीर सिंग यांचे गंभीर वक्तव्य

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असणार मराठी

News Desk

अखेर तारीख ठरली, MPSCची परीक्षा २१ मार्चला होणार

News Desk