HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव : संबंधित पुरावे कार्यकर्त्यांच्या लॅपटॉपमध्ये मुद्दाम पेरल्याचा संशय

नवी दिल्ली | बहु चर्चेत असलेल्या भीमा कोरेगाव या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून सरकार उलथवून लावण्याचा कट रचलेल्याचा आरोप करत करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील पुरावे संबधित कार्यकर्त्यांच्या लॅपटॉपमध्ये आढळल्याचे पोलिसांनी सांगितले होते. आता या पुराव्यांवरच संशय निर्माण करणारा एक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली यावरून संशय निर्माण झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील रोना विल्सन यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या लॅपटॉपमध्ये मालवेअर या वायरसच्या हल्ल्याद्वारे सरकारच्या घातपाता विषयीचे १० पत्रे लॅपटॉममध्ये पेरण्यात आल्याचे नव्या फॉरेन्सीक अहवालात म्हटले गेले आहे. हा अहवाल अमेरिकेतील मॅसेच्युसेटस येथील अर्सेनल कन्सल्टींग या डिजीटल फोरेन्सीक फर्मने दिला आहे. रोना विल्सन यांच्या वकिलांच्या विनंतीनंतर या कंपनीने या लॅपटॉपच्या इलेक्ट्रॉनिक प्रतिची तपासणी करुन हा अहवाल दिला आहे. या बाबतचे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना खटला न चालवताच गेल्या २ वर्षांहून अधिकाळ कैद्येमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांच्यावर UAPA कायद्यांअतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा निषेध करत अनेक मानवाधिकार संघटना आणि कायदे तज्ज्ञ याला सरकारच्या असंतोषा विरोधातील दडपशाही करणारी कारवाई मानतात. या काळात सरकारच्या टीकाकारांना भीती, छळ आणि अटकेचा सामनाही करावा लागला असल्याचा आरोप ही करण्यात येत आहे. त्यामूळे पुढे आणखी या प्रकरणात काय खुलासे समोर येतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित!

News Desk

बार्ज दुर्घटना | चौकशी भकटवून न्यायापासून लटकवणारे राज्य शासनातील झारितील शुक्राचार्य कोण?

News Desk

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

News Desk