HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : आता पेट्रोल पंपावर No Mask No Fuel

नवी दिल्ली | कोरोनाने देशात लोकांना वेठीस धरले आहे. याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. यात लोकांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामूळे आता पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय म्हणून ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोशियनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जो ग्राहक मास्क न घालता पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी येईल, अशा ग्राहकांना पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आम्ही आमच्या कर्मचा-यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. जर कोणत्या ग्राहकाने मास्क घातले नसेल तर त्यांना आम्ही इंधन देणार नाहीत, असे ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोशियनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सरकारने पेट्रोल पंपाला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले आहे. आम्ही आमच्या कर्मचा-यांच्या सुरक्षेचा खबरदारी उपाय म्हणून जे ग्राहक मास्क घालून येतील त्यांनाच इंधन देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान देशव्यापी लॉकडाऊनमुळे पेट्रोल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीनाथ मुंडे अन् शरद पवार दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत बॅनरबाजी

News Desk

अलाहाबादनंतर शिमलाचे नाव बदलून श्यामला होणार ?

Gauri Tilekar

फडणवीस सरकारने सांगितल्यामुळेच मी युक्तिवाद केला नाही ! मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांवर गंभीर आरोप

News Desk