मुंबई | देशात कोरोनाचा आढता हा वाढतोच आहे. देशाचा आकडा हा १७ हजाराच्या पुढे गेला आहे. तर, महाराष्ट्रात हा आकडा ४ हजारांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, जयपूर, इंदूर, कोलकत्ता आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची स्थिती ही गंभीर आहे. या सदर्भात गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्रही लिहिले आहे. या पत्रात नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्याने कोरोनाच्या संसर्गाच धोका हा अधिक वाढला आहे.
Union Home Secy Ajay Bhalla, in a letter dated 19 April 2020, has asked Chief Secretaries of all states/UTs drawing their attention to the guideline that state/UTs govts shall not dilute the guidelines under Disaster Mgmt Act, 2005 in any manner & shall strictly enforce the same. pic.twitter.com/gQehWI1XF0
— ANI (@ANI) April 20, 2020
दरम्यान, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी सर्वांना मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात हिंसाचार होत आहे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे, त्याचसोबत काही शहरांमध्ये गाड्यांची रहदारी सुद्धा मिळत असल्याचे सांगताना, हो होऊ न देण्याचे आवाहन त्यांनी सचिवांना या पत्राद्वारे केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.