HW News Marathi
राजकारण

मनमोहन सिंग यांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

जयपूर। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी (१३ ऑगस्ट) राज्यस्थानातून राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर २६ ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी मनमोहन सिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यासाठी मनमोहन सिंग हे काल सकाळी जयपूरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळामुळे मनमोहन सिंग यांचा विजय नक्की असल्याचा विश्वास मानला जात आहे. मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाल १४ जूनला संपुष्टात आला होता. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते. मनमोहनसिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, १९९१ ते २०१९ पर्यंत सलग पाच वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते, तर २००४ ते २०१४ यादरम्यान सलग दोनदा देशाचे पंतप्रधान होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला खासदारकी सोडून बॅग भरून थेट जम्मू-काश्मीरला जावसं वाटतंय !

News Desk

पीएम मोदींच्या ‘एअर स्ट्राईक’मुळे विरोधकांच्या महागाई, बेरोजगारीसह राफेल घोटाळ्यांवर ‘बॉम्ब’ पडला

News Desk

जनतेसोबत मोदींच्या संवादाला सुरुवात

swarit