HW News Marathi
महाराष्ट्र

“लज्जास्पद आहे कंगना राणावत”, उर्मिला- कंगना वादावर डॉ. माधुरी कानिटकर यांची प्रतिक्रिया

मुंबई | महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगना राणावत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. कंगनाचा धिक्कार करत उर्मिला यांचा अभिमान वाटल्याची भावना डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘सॉफ्ट पॉर्न’साठी परिचित असल्याची जहरी टीका कंगना राणावात हिने केली होती.

“लज्जास्पद आहे कंगना राणावत. मी सहसा कुणावर कधीच भाष्य करत नाही. पण एक स्त्री म्हणून हे मला खूप त्रास देणारे आहे” असे म्हणत “आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी” असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी ट्विट करत कंगनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://twitter.com/MadhuriKanitkar/status/1306452353529200640?s=19

 

काय म्हणाली होती कंगना?

“मी आज उर्मिला मातोंडकर यांची एक मुलाखत पाहिली. त्या संपूर्ण मुलाखतीत माझी खिल्ली उडवत होत्या. माझ्या संघर्षावरुन मला चिडवत होत्या. मी तिकीट मिळवण्यासाठी भाजपला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या. पण मला तिकीट मिळवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी खेळ करण्याची गरज नाही, हे सांगण्यासाठी कोणी हुशार असायची गरज नाही. उर्मिला मातोंडकर… ती एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

News Desk

कॉम्प्युटर हॅक होऊ शकतात, तर ईव्हीएम का नाही !

News Desk

राज्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव, रुग्णांची संख्या ५ वर

swarit