HW News Marathi
महाराष्ट्र

सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

मुंबई | विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील सायन रुग्णालय आंदोलना प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाच्या अदलाबदली प्रकरणी त्यांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून अपशब्दांचा वापर केला गेला होता. त्याचप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत ते झी २४ तासशी बोलत होते.

“या सरकराच्या उणीवा समोर आणल्यानंतर मुस्काटदाबी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यभर फिरत असताना आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा, त्रुटी दाखवतोय, वाढीव बिलांमुळे जनता त्रस्त आहे, असे विषय घेऊन मी लढत आहे. त्याचाच भाग म्हणून सायनला मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर सायन रुग्णालयाच्या दुरावस्थेसंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची गर्दी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाली आहे. परंतु केवळ दबाबतंत्र बनून, मुस्काटदाबी म्हणून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे”.

‘आम्हाला जनतेच्या हितासाठी आंदोलन करत असताना गुन्ह्याची पर्वा नाही. आमची जबाबदारी जनतेला न्याय देण्याची आहे. त्यामुळे रोज अशाप्रकारचे गुन्हे दाखल केले, तरी आंदोनल करत राहणार, हीच आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहील,’ अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यामुळे त्या लोकांना सोडून देण्यात आले- एनसीबी

News Desk

उठसूठ शरद पवारांवर बोलणार्‍या गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीने घेतला समाचार

Manasi Devkar

“मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे”- अतुल भातखळकर

News Desk