HW News Marathi
व्हिडीओ

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

आपण नक्की कितपत सुरक्षित आहोत ? आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का? तुमच्या आमच्यासारख्या मुंबईकरांच्या रोजच्या जीवनात धावपळ हा फक्त शब्द राहिला नसून आयुष्य जगण्याची एक पद्धत बनला आहे. हि धावपळ करताना आपण अनेक वाहतुकीच्या अनेक साधनांचा उपयोग करतो त्यापैकी प्रवासासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी आणि वेळ वाचवणारी म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन.

हि लोकल ट्रेन आपल्याला सुरक्षितपणे आपल्या स्थानकांपर्यंत पोहचवेल अशी प्रवांशांची अपेक्षा असते. पण अशा काही घटना समोर येतात कि आपल्याला प्रश्न करायला भाग पाडतात.

अशावेळी काही महत्वपूर्ण प्रश्नानी तुमच्या मनात नक्कीच घर केले असेल,जसे की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आपण सुरक्षिततेचा विचार केव्हा करणार, ही सुरक्षितता फक्त रेल्वे सुरक्षा दलाची जबाबदारी आहे का ? आणि अशावेळी रेल्वेच्या आपत्कालीन चैन कितपत प्रभावी असतात, त्याचबरोबर

दोन स्थानकांच्यामध्ये घडलेला हा प्रसंग त्या महिलेसाठी जीवघेणा ठरू शकला असता, अशावेळी प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ?

या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी जितके रेल्वे मंत्री पियुष गोयल बांधील आहेत तितकेच तुमच्या आमच्यासारखे सामान्य प्रवासीही हे प्रश्न उचलून धरण्यासाठी जबाबदार आहेत. तुमची सुरक्षा हि तुमच्याच हातात आहे, हे लक्षात घ्या आणि तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर आम्हाला संपर्क करा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला दिल्ली ला का निघाले ?

News Desk

अजबच! PM किसान योजनेतील जिवंत शेतकऱ्याला दाखवला मयत

Manasi Devkar

Nilesh Lanke यांच्यावर आरोप करणाऱ्या Jyoti Devre यांच्याविरोधात कोर्टात याचिका, Adv.Asim Sarode

News Desk