श्रीनगर | एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढा देत असताना, सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया काही केल्या कमी होत नाही. जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी (१८ एप्रिल) संध्याकाळी नाकाबंदी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र शहीद झाले. चंद्रकांत भगवंतराव भाकरे असे शहीद जवान यांचे नाव असून बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ते रहिवासी आहेत. ही दुखद बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
#Update The CPRF personnel who lost their lives in Sopore terrorist attack have been identified as 42-year-old Rajeev Sharma from Vaishali in Bihar, CB Bhakare (38) from Maharashtra's Buldhan & Parmar Stayapal Singh (28) from Sabarkantha in Gujarat: CRPF https://t.co/MTTpwYMxyu
— ANI (@ANI) April 18, 2020
गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. शुक्रवारी (१७ एप्रिल) चार अतिरेकी काश्मीरमध्ये शिरले होते. त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान सोपोरमध्ये जवानांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध सुरु आहे. शहीद जवान भाकरे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
#UPDATE Two jawans have lost their lives & another injured in a terrorist attack in Sopore, Baramulla in Jammu & Kashmir. https://t.co/u8vrWA6hm5
— ANI (@ANI) April 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.