HW News Marathi
महाराष्ट्र

आरोग्य विभागाने नव्याने ८ तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३००० च्या पुढे गेला आहे. तसेच, राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने ३० शासकीय रुग्णालये घोषित केले आहेत. तसेच, नवीन ८ रुग्णालये, वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाने ३१ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार विभागाच्या अखत्यारितील ३० रुग्णालये विशेष उपचारासाठी घोषित केली होती. त्यानंतर पुन्हा ६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर रुग्णालय क्र. ४ , पालघर ग्रामीण रुग्णालय, नंदुरबार, जालना, बीड आणि नांदेड जिल्हा रुग्णालय आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय अधिसूचित झाल्याने त्यामध्ये एकूण ६३० खाटा उपलब्ध झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेस-भाजपमध्ये ट्विटरवर काव्यात्मक जुगलबंदी

News Desk

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बोलावली बैठक

News Desk

शरद पवार हेच आमचे नेते, भाजप-राष्ट्रवादी मिळून राज्याला स्थिर सरकार देऊ !

News Desk